Posts

Showing posts from May, 2025

सुगंध आणि शहरे

Image
  सुगंध आणि शहरे श्रोत्रं चक्षु : स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च | अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते    || (Using the sense perceptions of the ears, eyes, skin, tongue, and nose, which are grouped around the mind, the embodied soul savours the objects of the senses.) वरील श्लोकात म्हटल्याप्रमाणे , आपली ज्ञांनेंद्रिये आपल्या बर्‍याचश्या आठवणी संचित करण्यासाठी नक्कीच कारणीभूत असतात , मग लहानपणी , घराबाहेर असलेल्या पेरुच्या , चिंचेच्या झाडाचा सुगंध असो किवा मोठेपणी , कॉलेज च्या कॅंटीन मधला तळलेला चायनिजचा सुगंध असो , प्रत्येक सुगंध , स्वतःबरोबर , एक तरी आठवणींचा घोळका जमा करतोच! तसं बघायला गेलं तर , माणूस म्हणजे तरी काय ? आठवणींचा जमा केलेला एक मोठ्ठा घोळकाच , आणि जर ह्या आठवणीच नसतील तर , नावापुरता काम करणारा यांत्रिक रोबोटच तो...पण मग , गंध आणि त्यासोबत साठवल्या गेलेल्या आठवणी , म्हणजे त्या व्यक्तीची ओळख असं म्हटलं गेलं तर ते कोणत्याही अंगाने चुकीचं ठरणार नाही. जितके जास्त गंध स्मरणात साठवलेले , तितक्याच चांगल्या आणि वाईट आठवणींची शिदोरी जास्त मोठी! फक्त ...